Thursday, October 31, 2024

ओमकार ध्यानसाधनेचे तंत्र (Omkar meditation)



#omkar chanting #how to meditate #simple way to dhyana

ओमकार ध्यानसाधनेचे महत्व

-------------------------------------------

ओम ध्यानसाधनेला भारतीय जीवनात अत्यंत महत्त्व आहे. ओमकाराला अनाहत नाद असे म्हणतात. विश्वातील पहिला नाद हा ओमकार आहे. ओंकार हा कार, ‘कार व कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. ओमकाराला प्रणव म्हटले आहे. प्रणव म्हणजे भगवंतासाठी उच्चारलेला स्तुतिपर शब्द. ओमकार हा आद्य स्वर असल्यामुळे ओमकाररुपी गणेशाला आपण आदी देवता म्हणतो.

 

कोणत्याही देवतेच्या पूजनाआधी गणेशाचे पूजन केले जाते. ओम मंत्राने आपल्या जीवनात सखोल परिणाम होतो. पण आपण ते जाणून न घेतल्यामुळे आपल्या अंतरात्म्याशी आपण एकरुप होऊ शकत नाही. ओम ध्यानसाधनेमुळे आपण आपल्या अंतरात्म्याशी एकरुप होतो. आपल्या दैनंदिन जीनवात आमुलाग्र बदल होतात व आपल्याला सुदृढ आयुष्य लाभते. म्हणूनच ओमला पवित्र चिन्ह मानले जाते.

 

ओमकार ध्यानसाधनेचे तंत्र :

 

१) एका शांत जागेची निवड करा.

२) ती जागा आरामदायक आणि सुखकारक असायला हवी.

३) आपले डोळे बंद करा आणि आपले स्नायू व नसा शिथील ठेवा.

४) आपल्या भुवयांमध्ये लक्ष केंद्रीत करा आणि शांत रहा.

५) आपले बहीर्मन शांत ठेवा आणि कशाचाही विचार करु नका, फक्त लक्ष केंद्रीत करा.

६) ओमकाराचा प्रारंभ करा, मनात अनंतकाळ, अमरत्व, असीम, आनंद अशा कल्पना करा.

७) तुम्ही स्वतःला असीम आणि जणू तुम्ही ब्रह्मांडाला व्यापलेले आहात असे समजा.

८) केवल ओमचा पुनरुच्चार न करता, अर्थासहीत उच्चार करा.

९) तुम्हाला हळूहळू पवित्र आणि परिपूर्ण वाटू लागेल.

१०) तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला सर्व काही माहित आहे आणि तुम्ही एका पक्षाप्रमाने मुक्त आहात.

११) तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात या विचाराने तरंग उठले पाहिजे. जेणेकरुन केवळ तुमचे मन नव्हे तर तुमचे शरीर, तुमच्या संवेदना सुद्धा ओमकाराच्या या पवित्र भावनेत मग्न होईल.

ही साधना न चुकता दररोज करा आणि विश्वास, प्रामाणिकपणा, उत्साह आणि चिकाटीने हे करा.

सकाळ, सूर्यास्ताच्या वेळी आणि संध्याकाळी ही ओमकार ध्यानसाधना करता येईल.

 

ओमकार ध्यानसाधनेचे फायदे :

 

१) ओम ध्यानसाधनेमुळे आजार बरे होतात, असे म्हटले जाते.

२) तुमच्या संपूर्न शरीरात कंपन होते, त्यामुळे तुम्हाला सकारात्मक वाटू लागते व तुम्ही आयुष्याकडे अधिक गांभीर्याने पाहू लागता. यामुळे अध्यात्मिक होता.

३) ओमकारामुळे तुमचे मन विचलित होत नाही.

जर तुम्ही उदासीन असाल तर लगेच ध्यानसाधना करावी.

४) किमान ५० वेळा ओमकार जपा आनि तुम्हाला बरे वाटेल.

५) तुमचा थकवा दूर होऊन, तुमच्या मेंदूला शांती मिळेल.

६) ज्यांना आत्मसन्मान मिळवायचा आहे, त्यांना ओमकारामुळे आमुलाग्र बदल दिसून येईल.

६) जर तुम्ही दीर्घकाळ ओम नामाचा जप करीत असाल, तर तुम्हाला प्रभावी आणि गोड वाणी प्राप्त होईल. सतत तालबद्ध ओमकाराने तुमचे मन खंबीर होईल.

७) तुम्हाला अशी जाणीव होईल की तुम्हाला एक वेगळी आणि आंतरिक शक्ती प्राप्त झाली आहे. ८) तुम्ही येणार्‍या समस्यांशी दोन हात करायला सज्ज होता आणि या जगात तुम्ही मानाचे स्थान पटकावता. हे तुमच्या डोळ्यातून आणि चेहर्‍यातून दिसून येते.

९) ओमकारात वैश्विक ऊर्जा सामावलेली आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि तुम्हाला शुद्ध झाल्यासारखे वाटते.

१०) या ध्यानसाधनेमुळे एक महत्वाचा बदल घडतो तो असा की तुम्ही चांगले विचार करु लागता आणि तुमची एकाग्रता वाढते.

हे लक्षात ठेवा :

अशा योग्य वातावरणाची निवड करा, जी जाग अनिर्जन असेल व तुम्ही योग्य पद्धतीने ध्यान करू शकाल. ओमकार करताना पेक्षा वर अधिक जोर द्या. या मंत्रोच्चारामुळे आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तुम्ही जप करत असताना जी स्पंदनं उमटतात, त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल व ती स्पंदने तुम्हाला जाणवू लागतील आणि तुम्हाला फारच शांत व वेगळे वाटू लागेल.

 

१) तस्य वाचक: प्रणव: ।  या योगसूत्रा प्रमाणे ओंकार हे ईश्वराचे नाव आहे.  भ्रमरी हा हटयोगप्रदीपिका या ग्रंथातील प्राणायाम आहे. 

2)  समाधी भावनार्थ क्लेश तनु  करणार्थच । या योग सूत्रा प्रमाणे  क्लेशाची तीव्रता कमी करण्या साठी  व समाधी प्राप्ती साठी  ओंकाराचा जप केला जातो.  चित्त प्रसादना साठी भ्रमरी प्राणायाम  चांगला आहे.

3)  भ्रमर हा कीटक आहे तर ओमकार हे ईश्वराचे नाव आहे. त्यामुळे नीच योनी पासुन ईश्वर स्मरणा पर्यंत मानवाची प्रगती व्हावी हा उद्देश आहे. 

4)  भ्रमरी प्राणायामाचा परिणाम फक्त सहस्त्रार चक्रावर होतो. ओंकार जपाचा परिणाम सर्वच चक्रा वर होतो.

1) ध्यान ही योगातील ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे.   ओमकार हे  आलंबन म्हणजेच ज्ञानाचा विषय आहे.

2) ध्यान ही चित्तवृत्तीचा निरोध करण्या साठी अष्टांग योगातील प्रगत अवस्था आहे.  ओमकार जप हा क्लेशाची तीव्रता कमी करण्या साठी  व समाधी प्राप्ती साठी सांगितलेला मार्ग आहे.

ओंकार त धारणा केली जाते,पंचज्ञानेद्रिय ओंकारावर एकाग्र करून धारणा केली जाते,धारणा दीर्घ काळ केल्याने पंचज्ञानेंद्रियां ची विसस्मृती होऊन ध्यान साधते म्हणजे च ओंकारात एकाग्रता आहे तर ध्यानात समरुपता/एकरूपता आहे


Saturday, July 13, 2024

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी योगाचे उपाय


"How Can Yoga Boost Immunity and Prevent Common Illnesses During the Rainy Season?"

According to Yogic Anatomy, certain imbalances may occur during the rainy season in India that can affect the physical and energetic well-being. Here are some common illnesses or imbalances that individuals may experience during this time:

  1. Aggravation of Vata Dosha: In Ayurveda and Yogic Anatomy, the rainy season is associated with an increase in Vata dosha, which represents the elements of air and space. The cool, damp, and windy nature of the rainy season can aggravate Vata, leading to various health issues.
  2. Respiratory Problems: The increased moisture in the air during the rainy season can contribute to respiratory problems such as colds, coughs, sinusitis, and asthma. It is essential to keep the respiratory system strong and practice pranayama (breathing exercises) to maintain healthy lung function.
  3. Digestive Disorders: The fluctuating weather conditions and changes in eating patterns during the rainy season can disrupt digestion. Digestive disorders such as indigestion, bloating, acidity, and diarrhea are common. Practicing mindful eating, consuming warm and easily digestible foods, and maintaining a balanced diet can help prevent such issues.
  4. Joint Pain and Stiffness: The cool and damp weather can aggravate joint-related issues like arthritis, stiffness, and pain. Regular yoga practice, especially gentle stretching exercises and joint mobilization techniques, can help maintain joint flexibility and alleviate discomfort.
  5. Weak Immunity: The fluctuating weather conditions and moisture provide a favorable environment for the growth of bacteria, viruses, and fungi, increasing the risk of infections. Strengthening the immune system through a healthy diet, regular exercise, adequate sleep, and stress management techniques can help prevent illnesses.
  6. Mental and Emotional Imbalances: The gloomy weather and reduced sunlight during the rainy season can impact mental and emotional well-being. Some individuals may experience mood swings, low energy levels, and seasonal affective disorder (SAD). Engaging in uplifting activities, practicing meditation, and maintaining a positive mindset can support emotional balance.

It's important to note that the impact of the rainy season on health can vary from person to person, and these imbalances can be mitigated through preventive measures and maintaining a healthy lifestyle. Ayurveda and Yoga offer specific practices and dietary recommendations to support overall well-being during different seasons, including the rainy season. Consulting with an Ayurvedic practitioner or healthcare professional who is familiar with Yogic Anatomy can provide personalized guidance for maintaining health during this time.